मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू होऊन 7 महिने उलटून गेले असून आता या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. मात्र त्याची धास्ती अनेक महिलांच्या मानत असून अवघ्या महिन्याभरात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये 5 लाखांनी घट झाली आहे.
यामुळे विविध चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता महायुती नेते उदय सामंत यांनी यावर स्पष्ट भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झाली शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितलं. या योजनेत काही नियम आहेत. ज्यांच वय 65 पेक्षा जास्त असेल, ती चालणार नाही , किंवा ज्यांच्याकडे चारचाकी असेल ती व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही. तसेच अनायवधानाने किंवा नजरचुकीने अशा महिला या योजनेत आल्या असतील तर त्या कमी झाल्या आहेत. जाणीवपूर्वी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही. ती आहे तशीच चालू राहणार आहे, लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
तसेच चारचाकीचा निकष, अडीच लाख इन्कम दाखवून कोणी इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर त्याही महिला योजनेचा लाभ घेण्यास अपात्र ठरतात, हे सर्व निकष आहेत. या सगळ्या नियमांत न बसल्यामुळे काही महिला कमी झाल्या असतील, पण सरसकट कुठेही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही किंवा त्यातले लाभार्थी कमी होणार नाहीत, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:40 07-02-2025














