रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे माजी शिवसेना आमदार सुभाष बने यांनी आज उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सोबत शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे शहरात भेट घेतली. शिवसेनेच्या “ॲापरेशन टायगर”अंतर्गत लवकरच माजी आमदार सुभाष बने यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश होणार असल्याची माहीती वरीष्ठ सूत्रांनी दिली आहे. येत्या काळात ठाकरे गटातून आणखी काही मोठे प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.














