चिपळूण : चिपळूण तालुक्यातील २ हजार ४९९ बेघरांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे मंजूर झाली आहेत. त्यामुळे त्यांना हक्काची घरे उपलब्ध होणार आहेत.
ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना तसेच कच्च्या आणि मोडकळीस आलेल्या घरात राहणाऱ्या मूलभूत सुविधांसह पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबवली जाते. या अनुषगांने चिपळूण तालुक्यालाही उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये चिपळूण तालुक्यातील २ हजार ४९९ घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले. २ हजार ४९९ लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर झाली आहेत.
राज्य शासनाच्या १०० दिवस उपक्रमात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा समावेश आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून तत्पुरतेने घरकुल योजनेचे उद्दिष्ट ठेवत ग्रामीण भागातील बेघर व कच्चे आणि मोडकळीस आलेल्या घरात राहणाऱ्या नागरिकांना मुलभूत सुविधांसह पक्के घर उपलब्ध करून देण्यात येते.
चिपळूण तालुक्यात प्रधानमंत्री आवास घरकूल योजनेसह अन्य योजनांही प्रभावीपणे राबविण्यासाठी पंचायत समितीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात एकही लाभार्थी राहता कामा नये याची काळजी आम्ही घेत आहोत. प्रधानमंत्री आवासमधून ज्यांना घरकुल मंजूर झाले आहेत, त्या मालकांशी संपर्क साधून पहिल्या टप्यात निधी देण्याचे कामही सुरू झाले आहे. प्रत्येकाशी समन्वय साधला जात आहे-मधुकर सावंत, ग्रामविस्तार अधिकारी, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 10/Feb/2025














