लाडकी बहिण योजनेची पाच टप्प्यांवर पडताळणी

सोलापूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी २८ जूनच्या शासन निर्णयानुसार सुरु झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीची आता निकषांनुसार पडताळणी सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यावर चारचाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरु असून पुढील टप्प्यांवर योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहेत, याची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी होणार आहे.
लाडकी बहीण योजनेतील तब्बल पाच लाख लाभार्थी (६५ वर्षांवरील, संजय गांधी निराधार व नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी महिला) कमी झाले आहेत. चारीही, योजनेच्या लाभार्थांची संख्या अडीच कोटीवर आहे.

राज्यातील सव्वाचार कोटी महिला मतदारांमध्ये अडीच कोटी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न खरोखर अडीच लाखपिक्षा कमी आहे का, या प्रश्नाचे उत्तर आगामी काळात शोधले जाणार आहे. याशिवाय एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिला लाभार्थीचीही पडताळणी होईल, विधानसभेपूर्वी जास्तीत जास्त महिलांना लाभदेण्यासाठी तालुका, जिल्हास्तरावरील समित्यांकडून लाभार्थीच्या कागदपत्रांची काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही.

त्यामुळे लाभार्थीची संख्या वाढली आणि सरकारला तिजोरीतून दरमहा ३,८८० कोटी रुपये द्यावे लागले. त्यासाठी सरकारला कर्जाची मदत घ्यावी लागली आणि विविध योजनांसाठी मागील साडेसात महिन्यांत सरकारने व एक लाख कोटींचे कर्ज काढल्याची वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आता लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार लाभार्थीची पडताळणी होईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

एक लाख कोटींचे कर्ज काढल्याची वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आता लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक निकर्षानुसार लाभार्थीची पडताळणी होईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

१९ लाख महिला शेतकऱ्यांचाही लाभ घटणार
केंद्र सरकारची शेतकरी सन्मान योजना व राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी १२ हजार रुपये दिले जातात. राज्यात दोन्ही योजनांच्या १९ लाख महिला शेतकरी लाभार्थी आहेत. त्यांना दोन्ही योजनांमधून दरमहा एक हजार रुपये मिळतात. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील बातील महिलांचा दरमहा १,५०० रुपयांचा लाभ कमी करून आता त्यांना दरमहा केवळ ५०० रुपयेच दिले जाणार असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्याची माहिती कृषी विभागाकडून घेण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरलेल्या महिलांकडून परत येणारी रक्कम जमा करून घेण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात आले आहे. सध्या चारचाकी वाहनधारक महिलांची पडताळणी सुरु असून पुढील टप्प्यातील पडताळणीचे आदेश प्राप्त झाल्यावर त्यासंद‌र्भात कार्यवाही होईल- रमेश काटकर, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, सोलापूर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 10/Feb/2025