राज ठाकरे स्वतःच्या मुलापेक्षा सहकाऱ्यांचा आधी विचार करतील : सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ही भेट म्हणजे संवाद आहे. आम्ही निवडणुका सोबत लढलोच पाहिजे असं आवश्यक नाहीये. मात्र ज्यांची वैचारिक भूमिका आमच्या विरोधात आहे.

त्यांच्या मनापर्यंत हा विचार पोहोचला पाहिजे की प्रखर राष्ट्रवादासाठी, परिवाराचा विचार करण्याऐवजी देशाचा विचार करणाऱ्यांनी एकत्र बसून विचार केला पाहिजे. काही पक्ष फक्त राज्याच्या विकासात स्पीड ब्रेकर बनतात. मात्र राज ठाकरे (Raj Thackeray) असे नेते नाहीत, ते स्पीड ब्रेकर बनत नाही तर सूचना करतात मार्गदर्शन करतात. त्यांच्या सूचना रास्त असतील तर सरकारने त्या मान्य कराव्यात.

किंबहुना अमित ठाकरेंना (Amit Thackeray) विधान परिषदेवर घेण्याबाबत कोर टीममध्ये काही चर्चा झालेली नाही. राज ठाकरे स्वतःच्या मुलाचा विचार करणार नाही. त्यांना विचार करायचा असेलही तर ते आपल्या पक्षातल्या एखाद्या सहकाऱ्याचा विचार करतील. अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनसे बाबत जे वक्तव्य केलं आणि दुरावा निर्माण झाला म्हणताय तर त्याबाबत अजित पवार यांनी चर्चा केली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करून काय फायदा, अजित पवारांच्या नेतृत्वावर मनसेने प्रश्नचिन्ह उभं केलंय. त्यामुळे अशा प्रकारचं उत्तर त्यांच्याकडून अपेक्षितच आहे. असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:55 10-02-2025