Maharashtra Weather : राज्यात उन्हाचा चटका वाढला!

Maharashtra weather update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात चांगलीच तापमान वाढ झाली आहे. उन्हाचा चटका वाढला असून थंडी गायब झाली आहे. रविवारी पुण्यात किमान तापमानाचा पारा 22° पर्यंत गेला होता.

तर कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले. मध्य महाराष्ट्र ,मराठवाड्यात किमान व कमाल तापमान चढेच असून येत्या 24 तासात हळूहळू 1 ते 2 अंशांनी तापमान घसरण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सध्या वायव्य राजस्थान व परिसरात चक्रकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. दरम्यान राज्यात कोरडे व शुष्क वारे वाहत असून उन्हाच्या तीव्र झळा नागरिकांना बसत आहेत.(Temperature Update)

राज्यात थंडी ओसरली असून तापमानात चढ-उतार होत आहे. उन्हाचा चटका काही ठिकाणी वाढू लागला आहे. रविवार (9 फेब्रुवारी) सकाळपर्यंतच्या 24 तासांत, सोलापूर, रत्नागिरी, जेऊर आणि अकोला येथे तापमान 35 अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले.

महाराष्ट्रात कसे राहणार हवामान?

राज्यात कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता असून, पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ही वाढ जाणवेल. मात्र, त्यानंतर तापमानात हळूहळू घट होईल. विदर्भात कमाल तापमानात मोठा बदल अपेक्षित नाही. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 24 तास तापमान स्थिर राहणार आहे. मात्र, त्यानंतर 3-4 दिवसांत 2 ते 3 अंश सेल्सियसने घट होण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र उलट परिस्थिती राहील, जिथे पुढील 3 दिवस किमान तापमानात 2-3 अंशांनी वाढ होईल आणि त्यानंतर मोठा बदल होणार नाही. एकूणच, महाराष्ट्रातील काही भागांत तात्पुरती उष्णता वाढण्याची शक्यता असून, त्यानंतर गारवा जाणवेल. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी या बदलत्या हवामानाचा विचार करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. (IMD Forecast)

विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांत उन्हाचा चटका अधिक जाणवण्याची शक्यता आहे.कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आर्द्रता वाढल्याने वातावरण उष्ण आणि दमट राहणार आहे.पुढील काही दिवस तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे, मात्र काही भागांत सौम्य वाढ होऊ शकते. शेतकऱ्यांसाठी पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असून, आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी कोरडे आणि शुष्क तापमान राहणार आहे.(Maharashtra Weather)राज्यात किमान आणि कमाल तापमान वाढले असून, उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, पुढील काही दिवस उन्हाचा प्रभाव जाणवेल, त्यामुळे नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:45 10-02-2025