चिपळुणातील क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी एसटी संघ विजेता

रत्नागिरी : महापुरुष पोलिस बॉईज, चिपळूण पुरस्कृत टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट कॉर्पोरेट चषक २०२५ स्पर्धा नुकतीच चिपळूण येथे घेण्यात आली. हे स्पर्धेचे ५वे वर्ष होते. रत्नागिरी एस. टी. संघाने विजेतेपद पटकावले. पोलिस पाटील संघ उपविजेता ठरला.

या स्पर्धेत एकूण १७ संघाने भाग घेतला होता. विजेता रत्नागिरी एस. टी. संघाला १० हजार रोख रक्कम व चषक, उपविजेता पोलिस पाटील संघाला ५ हजार रोख रक्कम चषक देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेतील मालिकावीर आणि अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार गुरुप्रसाद मुद्रे याने मिळवला. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज रत्नागिरी एस.टी. संघाचा विराज जाधव तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून याच संघाच्या उत्तम चव्हाण याला गौरवण्यात आले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार पोलीस पाटील संघाचा अंकुर हुमरे याने पटकावला. उत्कृष्ट कर्णधार म्हणून आर. डी. सी. ए. बँक संघाच्या योगेश सावंत याला देण्यात आला.

बक्षीस समारंभावेळी चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर, राजा चव्हाण, मयनु दखनी उपस्थित होते. या स्पर्धेला चिपळूण विधानसभा आ. शेखर निकम, विनोद झगडे, ए.पी.आय. भरत पाटील, डी. वाय. एस. पी. राज माने, पोलीस पाटील राजेश थरवळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. समालोचक म्हणून सिद्दिक मेमन पंच विक्रम भोसले, राजू कंगुटकर यांनी काम पाहिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 11/Feb/2025