मुंबई लोकलमध्ये मोबाईलचा स्फोट; डब्यात धुराचे लोट

मुंबई : मुंबई लोकलमध्ये मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना घडली. सदर घटनेनंतर लोकलच्या डब्यात असणाऱ्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.

10 फेब्रुवारीच्या रात्री 8:12 वाजता कळवा स्थानकावर सीएसएमटी-कल्याण लोकलमध्ये मोबाईल फोनचा स्फोट झाला.

घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या घटनेनंतर चांगलाच गोंधळ उडाला. मोबाईलच्या स्फोटामुळे डब्यात काहीसा धूरही पसरला होता.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशामक साधनांचा वापर केला.

लोकलमध्ये ज्या प्रवाशी महिलेचा मोबाईल फोन स्फोट झाला तिची ओळख अज्ञाप पटलेली नाही. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे.

सदर मोबाईल स्फोट बॅटरीतील बिघाड किंवा इतर काही तांत्रिक समस्यांमुळे झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:06 11-02-2025