रत्नागिरी : बँक ऑफ इंडियातर्फे देशभरातील सर्व शाखांमध्ये, तसेच प्रादेशिक कार्यालये आणि क्षेत्र सरव्यवस्थापक कार्यालयामध्ये गुरुवारपासून (ता.१३ ) ते १८ पर्यंत समझोता दिवस आयोजित केला आहे.
या कालावधीत एकरकमी परतफेड योजनेंतर्गत थकीत कर्जदारांना कर्ज खात्यांची परतफेड करता येणार आहे. बँकेने लहान किमतीची खाती आणि मध्यम आकाराची खाती तडजोड करण्यासाठी विशेष एकरकमी परतफेड योजना राबविली आहे. या योजनेचा लाभ खातेदारांनी घ्यावा, असे आवाहन बँकेचे रत्नागिरी येथील विभागीय व्यवस्थापक नरेंद्र देवरे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 12-02-2025














