ठाणे : शिवसेना उद्धव ठाकरेला मोठा धक्का देत राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजन साळवी यांचा प्रवेश झाला.
राजन साळवी यांच्यासोबत कोकणातील असंख्य पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें जोरदार भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी ठाकरे गटाला जोरदार टोला लगावला.
कोकणातील ढाण्या वाघ पुन्हा शिवसेनेच्या गुहेत आला. शिवसेनेत राजा का बेटा राजा नही बनेगा. जो काम करेल तो पुढे जाईल. शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची, कार्यकर्त्यांची आहे. तुम्ही आमच्या शिवसेना परिवारातील आम्हाला तुम्ही सहभागी होताय त्याचा आनंद आहे. मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. जिथे विचारांना लागली वाळवी, तिथे कसा राहिल राजन साळवी, असा बॅनर मी वाचला. तिकडे लागली वाळवी म्हणून इथे आले राजन साळवी, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:32 13-02-2025













