चिपळूण : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आयोजित कीर्तन महोत्सवात माजी खासदार शिक्षण महर्षी गोविंदराव निकम यांना मरणोत्तर मराठा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचे सुपुत्र आमदार शेखर निकम, पूजा निकम व कुटुंबीयांनी हा पुरस्कार स्वीकारला.
याप्रसंगी माजी आमदार निशिकांत जोशी यांनाही मरणोत्तर मराठा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. शुभदा जोशी, राजू जोशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. माजी सभापती, गरिबांचे नेते अशी ओळख असणारे स्व. बाळासाहेब माटे यांचाही मरणोत्तर मराठा भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यांचे सुपुत्र विजयशेठ माटे व त्यांच्या कुटुंबीयांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्याचबरोबर माजी आमदार, नाट्य क्षेत्रात मोठे योगदान देणारे राजाराम शिंदे यांचा मरणोत्तर मराठा भूषण पुरस्कार
जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांनी मार्गदर्शन केले. जगद्गुरू नरेंद्रचार्य यांनाही मराठा समाज रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी यावेळी आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव, आमदार किरण सामंत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप, माजी आमदार सदानंद चव्हाण, उपाध्यक्ष संतोष नानावटे, जिल्हाध्यक्ष संदीप सावंत, रत्नागिरी-सिंधुदुर्गचे प्रमुख अप्पा खैर, विवेक कदम, हरिश्चंद्र कदम आदी उपस्थित होते. नरेंद्रचार्य महाराज म्हणाले, दुसऱ्यासाठी जगा, तुम्ही आपोआप मोठे व्हाल. निशिकांत जोशी, राजाराम शिंदे, बाळशेठ माटे हे दुसऱ्यासाठी जगले म्हणून आज समाजरत्न ठरले. देहदान उपक्रम आम्ही राबवत असून, ८१ जणांनी देहदान केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:20 PM 17/Feb/2025
