गुहागर : कर्नाल (हरियाणा) येथे दि. १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान ७१ व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा १२ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाच्या कर्णधारपदी गुहागर तालुक्यातील काताळे गावची सुकन्या रेखा रविंद्र सावंत (सध्या रा. पुणे) हिची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला कबड्डी स्पर्धेत कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल काताळे पंचक्रोशीत जल्लोष करण्यात आला. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतून इराणमध्ये होणाऱ्या आशियाई कबड्डी स्पर्धेसाठी भारताचा महिला संघ निवडण्यात आला आहे, अशी माहिती राज्य संघटनेचे सचिव बाबूराव चांदरे यांनी पत्रकारांना दिली
हरियाणामधील स्पर्धेसाठी निवड झालेला संघ पुढील प्रमाणे-रेखा सावंत (कर्णधार), आम्रपाली गलांडे, मंदिरा कोकमकर, सलोनी गजमल, समरिन बुरोंडकर, तसलीम बुरोंडकर, पूजा यादव, प्रणाली नागदेवते, माधुरी गवंडी, ज्यूली मिस्किटा, निकिता पडवळ, दिव्या गोगावले, प्रशिक्षक संतोष शिर्के आणि संघ व्यवस्थापक सोनाली जाधव. या निवडीबद्दल रेखा सावंतचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. चांगल्या कामगिरीसाठी संघाला क्रीडाप्रेमींनी शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 20/Feb/2025
