मंडणगड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने शहरातील विविध संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवरुद्र अॅकॅडमी श्रीवर्धन यांच्या खेळाडूंनी मल्लखांब व दोरीवर खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून तालुकावासीयांची मने जिंकली. या वेळी शिवकालीन शस्त्रांची माहिती व प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिवजंयत्तीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जीवनचरित्र्यावर आधारित आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, गायन स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, वेशभूषा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या निमित्ताने शिवपालखीचे भिंगळोली ते मंडणगड परिसरात मिरवणूक काढण्यात आली. यानंतर मंडणगड बसस्थानकाचे परिसरात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी लेझीम या खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. ढोलताशा व घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक आबासाहेब हुलगे, अर्जुन हुल्लोळे, तालुका वैद्यकीय अधिकारी अभिषेक गावंडे, गटविकास अधिकारी विशाल जाधव, संतोष मांढरे उपस्थित होते. मराठा समाज कर्मचारी संघटनेच्यावतीने शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. राजे प्रतिष्ठान मंडणगड यांच्यावतीने रायगड ते मंडणगड शिवज्योत यात्रा काढण्यात आली.
रायगडावरून मावळ्यांचे आलेल्या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शहरात भव्य स्वागत केले. यानंतर, महिलांची बाईक रॅली काढण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 20/Feb/2025
