खेड-दापोली मार्गावरील दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी अज्ञातावर गुन्हा

खेड : खेड-दापोली मार्गावरील नारिंगीनजीक दुचाकीस्वारास धडक देवून अमोल बाबू चव्हाण (२५, रा. गावतळे-दापोली, मूळगाव विजापूर- कर्नाटक) याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहनचालकांवर अखेर १२ दिवसांनी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावरून पसार झालेल्या अज्ञात वाहनचालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

अमोल चव्हाण हा त्याचा भाऊ विनोद चव्हाण याच्यासमवेत खेड- दापोली मार्गावरून दुचाकीने (केए २८/एपी ८४४९) जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती. अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाचे डेरवण येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर अज्ञात चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. अद्यापही त्या पसार चालकाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 20/Feb/2025