रत्नागिरी : महावितरणने मागेल त्याला सौर कृषीपंप देण्याचे हे धोरण स्वीकारले आहे. त्या अनुषंगाने या योजनेतून कोकण परिमंडळातील रत्नागिरी जिल्ह्यात १४४ अर्ज सादर झाले. त्यापैकी १०२ लाभार्थ्यांनी पैसे भरले. त्यापैकी ८८ लाभार्थ्यांच्या ठिकाणी पाहणी झाली; पण अजूनही ते शेतकरी सौरपंपाच्या प्रतीक्षेत आहेत.
मागेल त्याला सौर कृषीपंप या योजनेसाठी केंद्र सरकारकडून ३० टक्के आणि राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान दिले जाते. त्यामुळे केवळ १० टक्के लाभार्थी हिस्सा भरून सौरपॅनल, कृषीपंपांसह संपूर्ण यंत्रणा लाभार्थ्यांला मिळते. या योजनेची ठळक वैशिष्ट्ये आणि लाभार्थी निवड, पात्रता निकषांनुसार शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत असलेली शेतजमीन असणे, पारंपरिक पद्धतीने कृषीपंपासाठी विद्युतजोडणी न झालेले शेतकरी, ५ एकरांपर्यंत शेतजमीनधारकास ३ अश्वशक्तीचा सौर कृषीपंप व ५ एकरांपेक्षा जास्त शेतजमीनधारकास ५ अश्वशक्ती व ७.५ अश्वशक्ती सौर कृषीपंप मिळतो. यापूर्वी शासनाच्या योजनेद्वारे कृषीपंपाचा लाभ न घेतलेले शेतकरी, अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यांस प्राधान्य, वनविभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने अद्याप विद्युतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी, “धडक सिंचन योजना” अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी योजनेस पात्र ठरवले जातात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 20/Feb/2025














