संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कारांत गुहागरचे वर्चस्व

रत्नागिरी : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना अंतर्गत २०२३-२४ चे ग्रामपंचायतीचे जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहे. या पुरस्कारामध्ये गुहागर तालुक्याने वर्चस्व प्राप्त केले आहे. राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचा ६ लाख रक्कम असलेला पुरस्कार प्राप्त झाला आहे.

शासनातर्फे दरवर्षी स्वच्छता मोहिमेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. सन २०२३-२४ ची पुरस्कार गुरुवारी जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पुरस्कार राजापूर तालुक्यातील कळसवली या ग्रामपंचायतीला प्राप्त झाला आहे. द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार गुहागर तालुक्यातील खामशेत व चिखली या ग्रामपंचायतींना मिळाला आहे. प्रथम, द्वितीय व तृतीय ग्रामपंचायतींना अनुक्रमे ६ लाख, ४ लाख आणि ३ लाख रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे.

त्याचबरोबर सांडपाणी व्यवस्थापनचा स्व. वसंतराव नाईक पुरस्कार आबलोली ता. गुहागर, पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार नाचणे, ता. रत्नागिरी तर शौचालय व्यवस्थापन स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार उमराठ, ता. गुहागर यांना प्राप्त झाला आहे. या सर्वांना ५०,००० हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:53 AM 21/Feb/2025