राजापूर : अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

राजापूर : अर्जुना नदीच्या खोऱ्यात करक पांगरी येथे अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. लवकरच या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.

या प्रकल्पामुळे राजापूर-लांजा पूर्व भागातील एकूण ५७०४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. महाराष्ट्रातील एक आदर्श व जिल्ह्यातील सर्वात मोठा महत्वांकांशी प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जात आहे. या प्रकल्पातील क्षेत्रातील लोंकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे.

प्रकल्पाच्या पाण्यावर शेती करण्यासाठी पाणी वापर संस्था स्थापन करून लाभधारकांना पीक पद्धती, पाणी वापर संस्थेचे प्रशिक्षण देऊन, पाण्याचे नियोजन करून लाभधारकांचा आर्थिक स्तर उंचावणे सहज शक्य आहे. यासाठी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन कशा पद्धतीने पाणीपुरवठा होणार आहे,नियोजन काय असणार आहे. या सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे.

हा प्रकल्प केंद्र शासनाच्या पंतप्रधान कृषी योजनेमध्ये समाविष्ट असून, प्रत्येक शेतकऱ्याला शाश्वत, मुबलक व वेळेवर पाणी देणे, हा उद्देश आहे. या दृष्टीने पाटबंधारे विभागाने योग्य नियोजन करून व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम केले तर हा भाग सुजलाम सुफलाम होण्यास फार वेळ लागणार नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:59 AM 21/Feb/2025