चिपळूण : महाराष्ट्र संघाचा आघाडीचा फलंदाज, प्रसिद्ध क्रिकेटपटू धीरज जाधव चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित आमदार चषकाच्या अंतिम सोहळ्यासाठी २२ तारखेला पवन तलाव मैदानावर उपस्थित राहणार आहे. भारतीय संघाकडूनही त्याने प्रभावी कामगिरी केली आहे.
५२ प्रथम श्रेणी सामने त्याने खेळले असून २६० त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यासाठी त्याला निमंत्रित करण्यात आले होते. २०११च्या मोसमात पुणे वॉरियर्स संघासाठी त्याला करिअर करारबद्ध करण्यात आले होते. २००८, २००९, आणि २०१० गोल्डन क्रिकेट लीगमध्ये हार्विच आरएमआय क्रिकेट क्लबसाठी इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी त्याने करार केला होता. २००७ मध्ये रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र विरुद्ध राजस्थान अशा झालेल्या सामन्यात त्याने शतक झळकावले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 21/Feb/2025
