रत्नागिरी : एसटीच्या विभागीय कार्यशाळा आवारातील भंगार लिलावात राज्यातील तब्बल २४ भंगार व्यावसायिकांनी भाग घेतला होता. भंगाराचा लिलाव झाल्यानंतर तो तातडीने उचलून नेला जावा यासाठी दररोज २० हजारांचे जागाभाडे आकारण्यात आले. यावरून भंगार व्यावसायिकांसह अधिकाऱ्यांमध्ये एकमत होत नसल्याची चर्चा सुरू आहे.
एमआयडीसीतील एसटीच्या विभागीय कार्यशाळेतील ४ कोटी रुपयांच्या भंगाराचा लिलाव झाला. या लिलावात मुंबई, पुणे, कोल्हापूर, जालना, सातारा, सांगली, हैद्राबाद येथील भंगार व्यावसायिकांनी भाग घेतला.
ज्यांना लिलाव मिळाला त्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या वजनाचे भंगार दुसऱ्या दिवसांपासून ट्रकने विभागीय कार्यशाळेच्या आवारातून न्यायचे होते. ज्या व्यावसायिकांनी भंगार उचलण्यास विलंब केला त्यांना भंगार ठेवलेल्या जागेचे दररोज २० हजार रुपयेइतके भाडे मोजावे लागले. सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आवारातून भंगार नेण्याची मुभा होती. या कार्यशाळेच्या आवारात येणाऱ्या ट्रकना काहीवेळा बाहेरच वाट पाहावी लागत होती. या प्रक्रियेत समितीतील अधिकारी आल्यानंतर त्यांनी आवश्यक कागदपत्रे पाहिल्यानंतर तो ट्रक आत घेतला जात होता. त्यानंतर भंगार भरले जात होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 21/Feb/2025
