रत्नागिरी : महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीची बैठक नुकतीच रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या सेवक सहकारी पतपेढी (पेण) येथे राज्य कार्याध्यक्ष नरसू पाटील व राज्य सहसचिव रोहित जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली. यात कोकण विभागीय टीडीएफच्या अध्यक्षपदी रत्नागिरी जिल्हा टीडीएफचे अध्यक्ष व रत्नागिरी माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष सागर पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.
कार्याध्यक्षपदी पालघरचे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त संतोष पावडे तर सचिवपदी रायगड माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष व सुधागड शिक्षणसंस्थेचे सदस्य राजेंद्र पालवे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. या वेळी नरसू पाटील यांनी टीडीएफचा इतिहास मांडला.
कार्यकारिणी पदाधिकारी असे- उपाध्यक्ष मायकल गोन्सालविस (वसई), रमेश म्हात्रे (रायगड), अंबर घोलप (ठाणे), अविनाश पाटील (रत्नागिरी), अजय शिंदे (सिंधुदुर्ग), सहसचिव सुशांत कविस्कर (रत्नागिरी), विजय मयेकर (सिंधुदुर्ग), कोषाध्यक्ष सुरेंद्र शिंदे (ठाणे), संघटक गणेश प्रधान (पालघर), संभाजी देवकते (रत्नागिरी), महिला प्रतिनिधी अर्चिता कोकाटे (रत्नागिरी) व मीनल गायकवाड (पालघर). सदस्य म्हणून रूपेश वझे (डहाणू), रमाकांत गावंड (रायगड), सचिन मिरगल (रत्नागिरी), अशोक गीते (सिंधुदुर्ग). स्वीकृत सदस्य म्हणून के. डी. पाटील (पालघर), भालचंद्र नेमाडे (मीरा-भाईंदर) व विनोद पन्हाळकर (रायगड).
या सभेमध्ये महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे राज्य अधिवेशन कोकण विभागातील पालघर जिल्ह्यामध्ये घेण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानुसार राज्य संघटनेने त्याला मान्यता दिली.
कोकण विभागाची प्रादेशिक रचना लक्षात घेता उर्वरित महाराष्ट्राप्रमाणे शैक्षणिक धोरणे कोकण विभागाला लागू करता येणार नाहीत. कोकण विभागासाठी स्वतंत्र शैक्षणिक धोरण राबवणे आवश्यक आहे, हे शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी कोकण विभागीय टीडीएफच्या माध्यमातून प्रामुख्याने प्रयत्न करू. – सागर पाटील, अध्यक्ष, कोकण विभागीय शिक्षक लोकशाही आघाडी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 21-02-2025
