गडचिरोली येथे होणाऱ्या अश्वमेध २०२५ साठी शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड

सावर्डे : शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालयामधील सुमारे ४० विद्यार्थ्यांची गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ येथे होणाऱ्या अश्वमेध २०२५ या आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीमार्फत निवड करण्यात आली.

गोंडवाना विद्यापीठात सुरु झालेल्या क्रीडा महोत्सवामध्ये बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कबड्डी, खो-खो, बुद्धिबळ या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. या सर्व क्रीडा प्रकारांमध्ये महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करण्यात आले. विशेष बाब म्हणजे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संघात सर्वात जास्त सहभाग शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचा आहे.

या सर्व विद्यार्थ्यांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आ. शेखर निकम, प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील, सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम यांनी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे क्रीडा निर्देशक सुहास आडनाईक यांचे मार्गदर्शन लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 21/Feb/2025