दापोलीतील वनविभाग ‘अॅक्शन’ मोडवर

दापोली : दापोली तालुक्यात कातभट्ट्या सुरू असल्याचे एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत वनविभाग अॅक्शन मोडवर आले असून, तालुक्यात सुरू असलेल्या कातभट्ट्या बंद केल्या आहेत. जिल्ह्यात कातभट्ट्या आणि कात कारखाने बंद असताना दापोलीत मात्र सुरू होत्या. दापोली वन विभागाने वृत्तपत्राची दखल घेत ही कारवाई केली आहे. तर या कातभट्ट्यांवर केलेल्या कारवाईची माहिती दापोली परीक्षेत्र वन अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली आहे.

तालुक्यातील कातभट्ट्यांवर बेकायदेशीर तोडीचा खैर लाकूड विकला जात आहे आशा तक्रारी वनविभागाकडे येत होत्या याची दखल वनविभाग यांनी घेतली आहे. तालुक्यात काही भागात लाकूड व्यापारी हे शेतकऱ्यांच्या रानातील लाकूड खरेदी करून त्याची तोड केल्यानंतर परवानगी न घेता विक्री करत आहेत.

याबाबत काही ठिकाणी वनविभागाने दंडात्मक कारवाई देखील केली आहे. तालुक्यात बेकायदेशीर वृक्षतोडीवरही वनविभागाने कारवाईची पावले उचलली आहेत. या वृक्षतोडी बरोबर वनविभाग वन्य जीव रक्षणाबाबत सतर्क झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 21/Feb/2025