खेड : तालुकास्तरीय पाककला स्पर्धेत ऋचा भोसले प्रथम

खेड : खेड पंचायत समिती शिक्षण विभाग व प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूलच्या इयत्ता सहावी मधील काव्या भोसले यांचे पालक म्हणून ऋचा भोसले यांनी केलेल्या पाककृतीला तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळाला. त्यांनी तांदळाचे लाडू, पेढे, शिरोळे व नारळाच्या दुधाचा रस, ढोकळा हे पदार्थ तयार केले होते. बक्षीस म्हणून रोख रक्कम पाच हजार रुपये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यांना शिक्षिका हेमा खेडेकर व मुग्धा बेलोसे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विस्तार अधिकारी संतोष भोसले, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक उत्तम कांबळे, परीक्षक जुई धामणकर तसेच स्पर्धक महिला उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 21/Feb/2025