लांजा : नासा-इस्त्रो परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

लांजा : जिल्हा परिषद रत्नागिरी आयोजित नासा, इस्रो परीक्षेत यश संपादन केलेल्या लांजा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा पदवीधर शिक्षक संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. पदवीधर शिक्षक संघटनेच्यावतीने विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, आर्थिक सहकार्य व भेटवस्तू देण्यात आल्या. जिल्हा परिषद रत्नागिरी आयोजित नासा इस्रो परीक्षेत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यावेळी लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, लांजा गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, वनगुळे गावचे सरपंच गुरव आदी उपस्थित होते. पदवीधर शिक्षक संघटनेच्यावतीने पाचही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी पदवीधर शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय डांगे, उदय घाडी, सरचिटणीस भागवत कुंभार, केंद्रप्रमुख भिकाजी रावले, उपाध्यक्षा अर्चना पेणकर, विजय विश्वासराव, शशिकांत बंडबे, अमित गराडे, प्रकाश जाधव, अरुण पाटोळे यांसह पदाधिकारी, शिक्षक माणिक कदम, विलास गोरे, रविंद्र निवळे, मंगेश कदम, पालक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 21/Feb/2025