खेळाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार : खासदार सुनिल तटकरे

चिपळूण : चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनने येथील सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी गेल्या दोन-तीन वर्षात मोठं काम केलं आहे. अध्यक्ष दशरथ दाभोळकर व त्यांचे सहकारी सातत्याने मेहनत घेत आहेत. येथील स्टेडियमच्या कामासाठी आपण सर्व सर्वतोपरी सहकार्य करू, आवश्यक तो निधी देऊ, अशी ग्वाही खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.

चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित आमदार चषक सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारी खासदार सुनिल तटकरे यांनी भेट दिली. या वेळी ते बोलत होते. मी क्रिकेट खेळत आलो. कॉलेज जीवनात सिझनवर क्रिकेट खेळलो, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. यामुळे संघटन कौशल्य आणि अन्य गुण मला मिळाले, असे कबुलीही खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेत आज शनिवारी अंतिम सामना प्रदीप स्पोर्ट्स आणि मालवणी कट्टा यांच्यामध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुनिल तटकरे यांनी या स्पर्धेला भेट दिली.

या वेळी त्यांच्यासोबत आमदार शेखर निकम, रणजीपटू धीरज जाधव सचिन कोळी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय बिरवटकर, जर्यद्रथ खताते, जिल्हा बँक संचालिका दिशा दाभोळकर, पूनम भोजने, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, सीमाताई चाळके, चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर, सचिव राजेश सुतार, सुयोग चव्हाण, उदय काणेकर, योगेश बांडागळे, इब्राहिम सरगुह, समालोचक प्रशांत आदवडे, प्रशांत कदम, संदेश गोरिवले, दिनेश माटे, डॉ. अभिजित सावंत, मंगेश कदम, राकेश दाभोळकर, बाळू खताते, रियाज खेरटकर, जाकीर शेकासन, उदय ओतारी यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या वेळी असोसिएशनच्यावतीने खासदार सुनिल तटकरे यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेसाठी अहोरात्र महेनत घेणाऱ्या भाऊ देवरुखकर, रणजीपटू धीरज जाधव याचाही असोसिएशनच्यावतीने खा. तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच चिपळूण सायकल क्लबमधील विक्रमवीर सायकलपटूंचाही या वेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीद खेरटकर यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:56 PM 22/Feb/2025