गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर हाती घेण्यात आलेल्या सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन मोहिमेत रविवारी कासव मित्रांच्या विशेष सहकार्याने सागरी कासवांची ४७ पिल्ले समुद्रात सुरक्षितपणे सोडण्यात आली.
गणपतीपुळे येथे समुद्र किनाऱ्यावर कांदळवन दक्षिण विभाग परिक्षेत्र रत्नागिरीच्या वतीने सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन मोहीम अंतर्गत अंडी उबवणी केंद्रामध्ये कासवांच्या संरक्षित प्रजाती तयार केल्या जात आहेत. त्यामध्ये ठेवण्यात आलेल्या घरट्यांमधील सुमारे १३७कासवांची पिल्ले किनाऱ्यावर संरक्षित करण्यात आली होती. संरक्षित केलेल्या अंड्यांमधील पिल्लांना ४७ सुरक्षितरित्या गणपतीपुळे अंडी उबवणी केंद्रासाठी नियुक्ती करण्यात आलेले कासवमित्र वीरेंद्र सुर्वे व मालगुंड येथील कासवमित्र आदित्य मयेकर यांच्या विशेष सहकार्यान गणपतीपुळे समुद्रात सोडण्यात आले आहे.
या अंडी उबवणी केंद्रामध्ये समुद्री कासवांची पिल्ले सोडल्यानंतर उर्वरित अंड्यांना योग्य प्रकारे संरक्षित करण्यासाठी कासवमित्र वीरेंद्र सुर्वे व मालगुंड येथील कासवमित्र आदित्य मयेकर यांच्या वतीने विशेष काळजी घेतली जात आहेत. समुद्री कासवांच्या प्रजाती संरक्षित करण्यासाठी मोठी मेहनत घेतली जात आहे. त्यामुळे गणपतीपुळे व मालगुंड किनाऱ्यावर सागरी कासव संरक्षण आणि संवर्धन व यशस्वी होत असल्याचे मत व्यक्त होत आहे.
१३७ समुद्री कासवांची अंडी संरक्षित…
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर रविवारी ४७ समुद्र कासवांची पिल्ले सुरक्षितरित्या समुद्रात सोडण्यात आले. किनाऱ्यावर असलेल्या अंडी उबवणी केंद्रामध्ये सुमारे १३७ समुद्री कासवांची अंडी संरक्षित करण्यात आली असल्याची माहिती कासव मित्र वीरेंद्र सुर्वे यांनी दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 25/Feb/2025













