राजापूर : केळवलीमध्ये आज संगीत बिबट आख्यान

राजापूर : जिल्ह्यामध्ये मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढत आहेत. वन्यजीवांचे मानवी जीवनात किती महत्त्व आहे ते पटवून देण्यासाठी स्थानिक लोककलेच्या माध्यमातून सादरीकरण केले जाणार आहे. वनविभाग आणि डब्ल्यूसीएस इंडिया, रेनमॅटर फाउंडेशन आयोजित संगीत बिबट आख्यान मंगळवारी (ता. २५) केळवली (ता. राजापूर) ग्रामपंचायतीच्या सभागृहात दुपारी ३ वाजता आणि २६ ला मार्लेश्वर येथे सकाळी १० वाजता होणार आहे.

विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांच्या संकल्पनेतून संगीत बिबट आख्यानाचे कार्यक्रम केले जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी सहायक वनसंरक्षक प्रियांका लगड, डब्ल्यूसीएस-इंडियाच्या संचालक डॉ. विद्या अत्रेय, मानव-वन्यजीव सहसंबंध विभागाचे मॅनेजर निकित सुर्वे, दीप्ती हमरसकर, अक्षय मांडवकर यांचे सहकार्य लाभले आहे.

कलेच्या वन्यप्राण्यांविषयी माध्यमातून जनजागृती करण्यासाठी सीताई क्रिएशन्सने “वन्यवाणी” ही चळवळ सुरू केली आहे. त्यामधील संगीत बिबट आख्यान ही एक नाट्यकृती आहे. या नाट्यकृतीच्या निर्मात्या कुणिका बनसोडे-सावंत या असून, लेखक-दिग्दर्शन धुरा मकरंद सावंत यांनी केले आहे. रोमांचक कथा आणि लोकसंगीताच्या माध्यमातून मानव-बिबट संघर्षांवर हे नाटक भाष्य करते. नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 25/Feb/2025