रत्नागिरी : न्यायालयाचा मनाई आदेश धुडकावून दाम्पत्याकडून घरात शिरुन नासधूस

रत्नागिरी : तालुक्यातील मौजे रनपार गोळप येथे दाम्पत्याने न्यायालयाच्या मनाई आदेशाचा भंग करत फिर्यादीच्या घरात दोघा संशयितांवर गुन्हा दाखल अतिक्रमण करुन तेथील सामानाची नासधूस केली. ही घटना ३१ जानेवारी रोजी सकाळी ९.४५ वा. सुमारास घडली होती.

विनायक वामन सुर्वे व त्याची पत्नी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात संजय वामन सुर्वे (५४) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दिवाणी न्यायालयाने या दाम्पत्याला फिर्यादीच्या कब्जा वहिवाटीतील घरात अतिक्रमण करण्यास मनाई केली होती. परंतु, ३१ जानेवारी रोजी या दांपत्याने न्यायालयाच्या या आदेशाचा भंग करत फिर्यादीच्या घरात अतिक्रमण करुन घरातील सामानाची नासधूस करुन आगळीक केली. त्या नंतर त्यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संजय वामन सुर्वे यांनी २४ फेब्रुवारी रोजी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 26/Feb/2025