चिपळूण : खेर्डी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अभिजित जयंद्रथ खताते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व सदस्यांना सामावून घेत गावात विविध शासकीय योजना राबविण्यात येतील. शिवाय ग्रॅव्हिटी पाणी योजनेच्या कामाला गती देण्यास कटिबद्ध राहू, असा विश्वास नवनिर्वाचीत उपसरपंच अभिजित खताते यांनी व्यक्त केला.
खेर्डी ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच सुगंधा माळी यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक झाली. उपसरपंचपदासाठी अभिजित जयंद्रथ खताते यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तत्कालीन उपसरपंच सचिन मोहिते यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. निवडीनंतर खेर्डीसह तालुक्यातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित उपसरपंच अभिजित खताते यांचे अभिनंदन केले.
अभिजित खताते हे सध्या राष्ट्रवादी युवक काँग्रेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. उच्चशिक्षित असलेले उपसरपंच पदाला चांगला न्याय देतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे काँग्रेस प्रदेश सचिव जयंद्रथ खताते यांनी व्यक्त केला. यावेळी माजी सरपंच सुनिल मेस्त्री, माजी सभापती स्नेहा मेस्त्री, माजी सरपंच प्रकाश पाथरवट, अजित खताते, शशिकांत कासार, विनोद भुरण यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 27/Feb/2025












