रत्नागिरी : बोर्डींग रोड येथील विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी : शहरातील बोर्डिंग रोड येथील विवाहितेने अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवार २ मार्च रोजी सकाळी ९.३० वा. सुमारास उघडकीस आली. निकिता गौतम तुपेरे (४०, रा. मिशन कॅम्प, बोर्डिंग रोड, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

याबाबत तिच्या नातेवाईकांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, निकिता तुपेरे हिने कोणत्यातरी अज्ञात कारणातून राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील रुममधील लाकडी भालाला नायलॉनच्या साडीने गळफास घेतला. ही बाब तिच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:58 AM 03/Mar/2025