वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) न्याय आणि कर्मफळदाता म्हणतात. शनी (Lord Shani)एका ठराविक अंतराने वक्री आणि मार्गी होतात. शनीच्या वक्री होण्याचा चांगला परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, शनीने 30 जून रोजी वक्री अवस्थेत प्रवेश केला होता.
आता शनी देव नवरात्री, दसरा आणि दिवाळीतसुद्धा वक्री अवस्थेतच असणार आहे. अशातच कुंभ राशीत शनी 15 नोव्हेंबरपर्यंत वक्री अवस्थेतच असणार आहे. त्यामुळे पुढच्या 42 दिवसांत काही राशींच्या लोकांचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते आपण जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
शनीची कुंभ राशीत उलटी चाल चालल्याने मेष राशीच्या लोकांची नशीब अचानक बदलू शकतं. कारण यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, पुढच्या 42 दिवसांत मेष राशीच्या लोकांचे चांगले दिवस येतील. उत्पन्नाचे अनेक नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. सुख-समृद्धीत चांगली वाढ होईल. करिअर, व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रचंड यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या सर्व आर्थिक समस्या सुटतील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
शनीचं वक्री अवस्थेत असणं मिथुन राशीच्या लोकांना वरदानापेक्षा कमी नाही. कारण शनी मिथुन राशीच्या नवव्या चरणात वक्री होणार आहे. त्यामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. त्याचबरोबर तुम्ही धार्मिक यात्रेला देखील जाऊ शकता. या काळात करिअरशी संबंधित शुभ वार्ता तुम्हाला मिळू शकते. कुटुंबातील सदस्य आणि मित्रांच्या मदतीने तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. मित्रांचं सहकार्य मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
पुढच्या 42 दिवसांपर्यंत कुंभ राशीच्या लोकांवर शनीची कृपा असणार आहे. शनी कुंभ राशीच्या लग्न भावात वक्री झाले आहेत. त्यामुळे शश राजयोगाची देखील निर्मिती झाली आहे. या काळात तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे पूर्ण होतील. तुमच्या योग्य प्रयत्नांनी प्रत्येक क्षेत्रात यशाची नवीन दारं उघडू शकतात. तुमची आर्थिक समस्या लवकरच दूर होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. पैशांची आवक वाढेल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 04-10-2024