राजापूर : धोपेश्वर तिठवली येथे श्री भराडीन देवीचा उद्यापासून वार्षिक यात्रोत्सव

राजापूर : शहरानजीकच्या धोपेश्वर तिठवलीची ग्रामदेवता श्री भराडीन देवीचा वार्षिक यात्रोत्सव बुधवार दि. ५ मार्च रोजी पारंपारिक पध्दतीने साजरा केला जाणार आहे.

देवीच्या यात्रोत्सवाची सुरुवात सकाळी ९ वा. देवीच्या पारंपारीक पुजेने होणार आहे. त्यानंतर १०.३० वा. श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुपारी १२.०० वा तिर्थ-प्रसाद, महिलांसाठी हळदी-कुंकू व दुपारी १२.३० ते २.३० महाप्रसाद सायं. ६.०० वाजता हरीपाठ कार्यक्रम, सायं. ७.०० ते ८.०० वाजता पालखी मिरवणूक रात्री. १०.०० वा. श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ, कुडाळ यांच्या पारंपारीक व आधुनिक फुगड्या हा करमणूकीचा कार्यक्रम होणार आहे.

तरी आपण सहकुटुंब, सहपरिवार दर्शनाचा व कृपाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन गावप्रमुख केशव तेरवणकर तसेच तिठवली ग्रामस्थ मंडळ, मुंबई, प्रार्थना ग्रुप, व तिठवली ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 04/Mar/2025