◼️ शाळेच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थांचे हाल! प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी
रत्नागिरी : अचानक मुलाना सांगितलं जात आहे तुमचा नंबर दुसऱ्या शाळेत आहे. शाळेच्या गलथान कारभारामुळे मुलांचे हाल झाले आहेत. पालकवर्ग ही चिंतेत शेवटच्या क्षणी शाळा कुठे शोधणार!
10 च्या परीक्षा सुरु झाल्या असून आज अचानक मेस्त्री हायस्कूल येथे मुलं परीक्षेला गेलेली असताना अचानक त्यांना तुमचा नंबर जीजीपीएसला आलेला असल्याचे सांगितल्याने एकच खळबळ आहे.
मुळात आधी आदल्या दिवशी जर मुलांना सांगितलं गेलं असतं की उद्या तुमचा नंबर जीजीपीएसला आहे तर मुलं त्याच दिवशी त्या वेळेला त्या सब सेंटरला परीक्षेला जाऊ शकतात.
दरम्यान शेवट च्या क्षणाला मुलं परीक्षा देण्यासाठी केंद्रावर आलेले असताना किंवा शाळेत आलेले असताना अचानकपणे त्यांना सांगितलं जातं की तुमचा आज इथे नंबर नाहीये त्यामुळे पालक व मुलांच्या मध्ये एकच घबराट होते.
आणि दहा वाजता हे सांगितले गेल्यामुळे 11 चा पेपर असतो मुलं पॅनिक होतात.
अशावेळी शाळा व्यवस्थापन किंवा संबंधित शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांनी इथे लक्ष देणे आवश्यक आहे.
कारण जेव्हा तुम्ही परीक्षा घेता तेव्हा त्या मुलांना उद्या तुमचा पेपर कुठे आहे किंवा कुठे तुमचं केंद्र हे आदल्या दिवशी सांगितलं तर त्या दिवशी पेपरच्या दिवशी मुलं वेळेवर पेपर द्यायला त्या केंद्रावर किंवा त्या शाळेत जाऊ शकतात.
दरम्यान मुलांना झालेल्या मनस्ताप बद्दल पालकांनी एकच संताप व्यक्त केला आहे.
कारण अशावेळी मुलं घाबरली जातात किंवा काही लोकांना मुलांना शाळा माहिती नसतात त्यामुळे शोधण्यात त्यांना वेळ जातो.
दरम्यान याबाबत जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालावं, असे मागणी पालकांनी केली आहे.
10 वी परीक्षा बैठक व्यवस्था मधील गोंधळ..
अचानक बैठक व्यवस्थेत बदल्यामुळे विद्यार्थ्याना त्रास होत असून…पेपरच्या दिवशी दुसऱ्या दिवशीची पेपर ची बैठक व्यवस्था वर्गात सांगायला पाहिजे.
असे न होता अचानक शाळा पेपर दिवशी बैठक व्यवस्था बदली असल्याची माहिती 10 वाजता मुलांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे पेपर दिवशी सकाळी मुलं गोंधळात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 05-03-2025












