Navpancham Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहांचं काही काळानंतर संक्रमण होतं. या दरम्यान अनेक शुभ राजयोग जुळून येतात. याचाच प्रभाव देशभरात पाहायला मिळतो. माहितीनुसार, शनिवारी 8 मार्च रोजी सूर्य आणि मंगळ ग्रह मिळून नवपंचम राजयोग (Navapancham Yog) निर्माण करणार आहे.
असा योग तेव्हाच जुळून येतो जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या 120 अंशावर असतात. त्यामुळे या शुभ योगाचा लाभ नक्कीच काही राशींच्या लोकांवर होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवपंचम योग लाभदायक ठरु शकतो. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये एक चांगला मार्ग मिळेल. या मार्गानवर तुम्हाला अनेक अडथळे येतील मात्र तुम्ही डगमगणार नाही कारण या राशीच्या ग्रहांची स्थिती शुभ असणार आहे. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ झालेली दिसेल. समाजात तुमची लोकप्रियता अधिक वाढलेली दिसेल. तसेच, शैक्षणिक बाबतीत तुमचा अधिक चांगला काळ सुरु झालेला असेल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
नवपंचम योग जुळून आल्यामुळे धनु राशीच्या लोकांना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात तुमच्या व्यवसायाचा अधिक विस्तार झालेला पाहायला मिळेल. तसेच, परदेशातील तुमचे संबंध अधिक दृढ होतील. कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात प्रवास करावा लागू शकतो. तसेच, भाग्याची चांगली साथ तुमच्या बरोबर असणार आहे. या दरम्यान जे लोक बेरोजगार आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope)
नवपंचम योगामुळे सिंह राशीच्या लोकांना फार शुभ परिणाम पाहायला मिळतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेतच, एखादी नवीन डील तुमच्या हातात येऊ शकते. यावर तुम्ही फार मेहनत घ्याल. तुमच्या व्यवसायात तुम्ही घेतलेली मेहनत दिसून येईल. त्या कष्टाचं फळ नक्कीच तुम्हाला एक दिवस मिळेल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 06-03-2025













