चिपळूण : १८ पाणीपट्टी थकबाकीदारांची नळ जोडणी तोडली

चिपळूण : नगर परिषद प्रशासनाने सोमवारपासून मालमत्ता जप्तीसह पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी विविध पथकांना शहरातून २ लाख २० हजार रुपयांची वसुली करण्यात यश आले. पाणीपट्टी भरण्याकडे कानाडोळा करणाऱ्या १८ जणांची नळ जोडणी तोडण्यात आली आहे. या कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

नगर परिषदेला मालमत्ता व पाणीपट्टी करातून थकीत व चालू वर्षाची मिळून १८ कोटी ३३ लाख ८१ हजार ५३७ रुपयांची वसुली अपेक्षित आहे. त्यापैकी आजपर्यंत ९ कोटी ५८ लाख ६५ हजार १०२ रुपये वसूल झाले आहेत. अजूनही ४८ टक्के वसुली बाकी आहे. ही वसुली पूर्ण करण्यासाठी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली २ लाख २० हजार रुपयांची एका दिवसात वसुली
उपमुख्याधिकारी तथा कर वसुली अधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. ३१ मार्च ही मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी अंतिम मुदत आहे. शंभर टक्के कर वसुली व्हावी, अशा शासनाकडून सूचना दिल्या जात आहेत.

मात्र, आर्थिक वर्ष संपण्यासाठी महिनाभराचा कालावधीही शिल्लक राहिलेला नाही. तरीही केवळ ५२ टक्के वसुलीच झाल्याने नगर परिषद प्रशासनाने सोमवारपासून कारवाईची मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी विविध पथकं तैनात करण्यात आली आहेत. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी स्वतः मैदानात उतरत आपल्या टीमसह थकबाकीदारांच्या भेटी सुरू केल्या आहेत. नगर परिषदची टीम घराच्या दारापर्यंत आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:06 PM 06/Mar/2025