खेड : तालुक्यातील नांदगाव-जाखलवाडी येथे गुरुवारी दुपारी ३च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत घर भस्मसात झाले. शॉर्टसर्किटनंतर झालेल्या सिलिंडर स्फोटाने आगीचा भडका उडाला. आगीत घरासह गृहोपयोगी साहित्य जळून खाक होऊन लाखोंची हानी झाली.
आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. घरात कोणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. नांदगाव-जाखलवाडी येथे वास्तव्यास असलेल्या राजश्री दौलत खोपटकर या काही कामानिमित्त शहरात आल्या होत्या. दुपारच्या सुमारास अचानक त्यांच्या घराने पेट घेतला. रणरणत्या उन्हासह वाऱ्यामुळे काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 08/Mar/2025














