पावस : शेतीच्या कामातून दमूनभागून आलेल्या ग्रामस्थांना आनंद मिळावा, वाडीच्या विकासाबाबत सर्वांनी एकत्र येऊन चर्चा करावी, हा उद्देश समोर ठेवून लांजा तालुक्यातील हर्चे-पनोरची वरचीवाडी येथे नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे.
पंधरा वर्षांपूर्वी सुरू झालेला नवरात्रोत्सव नावारूपास आला आहे. पोलिसपाटील दीपक तरळ, गावकरी आनंद निवळकर, मंगेश कुसम, वसंत निवळकर, दीपक पोवार, सखाराम कुसम, विजय तरळ यांनी एकत्र येत पुढाकार घेतलेल्या नवरात्रोत्सवास तरुण विकास मंडळ मुंबई, महिला मंडळ यांचे आजवर समर्थ योगदान लाभत आहे. वाडीतील सार्वजनिक चौकात देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. रात्री गरबा खेळ आणि अन्य आयोजित कार्यक्रमासाठी शोभना कुळये यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे. नऊ दिवस देवीची पूजा गावकर यशवंत निवळकर करतात. दररोज रात्री गरबा नृत्य केले जाते. त्यामध्ये आबालवृद्धाही सहभागी होतात. वाडीतील ऐक्य टिकून राहावे, दमूनभागून आलेल्या कष्टकरी नागरिकांचे मनोरंजन व्हावे, वाडीच्या विकासाबाबत चर्चा व्हावी, यासाठी स्थापन केलेल्या नवरात्रोत्सव मंडळाने यावर्षी मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष आनंद निवळकर यांच्या अध्यक्षतेखाली पनोरची वरची वाडीतील सर्व ग्रामस्थ, महिलावर्ग अधिक परिश्रम घेत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 05/Oct/2024
