खेड : तालुक्यातील आंबडस येथील ग्रीनव्हिला फार्महाऊसमधील १०५ नंबरच्या खोलीची खिडकी तोडून बॅगेतील दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. ९ मार्च रोजी घटना घडल्याचे संतोष शितोळे (४९) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार बुधवारी सायंकाळी उशिरा अज्ञात चोरट्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ते ग्रीनव्हिला फार्महाऊमध्ये १०५ नंबरच्या खोलीत वास्तव्यास होते. चोरट्याने खिडकीची स्लायडींगची काच सरकवून त्याद्वारे आतमध्ये प्रवेश करत बॅगेत ठेवलेले ५ ग्रॅम वजनाचे २ सोन्याचे कानातील एअरटॉप, २ सोन्याचे वेल, ५ ग्रॅम वजनाच्या २ सोनसाखळ्या लंपास केल्या. घरफोडी झाल्याचे निदर्शनास येताच पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. घरफोडीचा छडा लावण्यासाठी गुरूवारी सायंकाळी श्वानपथकासही पाचारण करण्यात आल्याचे समजते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:58 PM 15/Mar/2025














