रत्नागिरी : कोतवडे येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे येथे वृद्धाने अज्ञात कारणातून झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार १५ मार्च रोजी पहाटे ४ वा. सुमारास उघडकीस आली. बाळू दशरथ चव्हाण (६०, रा. गावणवडी कोतवडे, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या वृध्दाचे नाव आहे. याबाबत त्यांच्या भावाने ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, बाळू चव्हाण यांना दारुचे व्यसन होते. शनिवारी पहाटे त्यांनी अज्ञात कारणातून घराच्या पाठीमागील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब त्यांच्या नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्यांना खाली उतरवून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळू चव्हाण यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 17/Mar/2025

Amey jwelrs