रत्नागिरी : सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर संस्था काम वाटप समिती उद्या सभा

रत्नागिरी : जिल्हा परिषदेची सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था यांच्याकरिता काम वाटप समिती सभा १८ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता कै. शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आलेली असल्याचे सदस्य सचिव काम वाटप समिती तथा कार्यकारी अभियंता, जि.प. बांधकाम विभाग यांनी कळविले आहे. या सभेमध्ये रु. १० लक्षच्या आतील कामांचे वाटप होणार आहे. १८ मार्च रोजी मजूर सह. संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता (विद्युत) सुशिक्षित बेरोजगार अभियंता (स्थापत्य) संपूर्ण जिल्ह्यासाठी सकाळी ११.३० वाजता काम वाटप समिती सभा आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 17/Mar/2025