डेरवण येथील राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या ऍकवा टेकनिक्स ची चमकदार कामगिरी

रत्नागिरी : दिनांक 15 व 16 मार्च रोजी डेरवण येथे येथे जलतरण स्पर्धा संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत रत्नागिरीच्या ऍकवा टेकनिक्स अकॅडमीतुन नऊ जलतरणपटूनी सहभाग घेतला होता. त्यामधील 16 वर्षाखालील गटामध्ये रत्नराज पाटील याने 100 मिटर बॅटरफ्लाय प्रकारात ब्रॉन्झ मेडल तसेच 10 वर्षखालील मुलीमध्ये आज्ञा शिंदे हिने 200 मीटर वयक्तिक मिडले प्रकारात ब्रॉन्झ मेडल मिळवले.
तसेच रुद्र शेट्ये, कृष्णा पाखले, सान्वी साळवी ह्या स्पर्धेकांनी फायनल मध्ये प्रवेश करून कडवी झुंज दिली. त्याचप्रमाणे भावेश कोंडे, रुद्र लाड, आयुष चव्हाण, सान्वी चव्हाण ह्या स्पर्धाकांनी स्पर्धा पूर्ण केली.

सर्व स्पर्धाकांना राष्टीय जलतरणपटू व प्रशिक्षक विवेक विलणकर सरांचे मार्गदर्शन लाभत आहे. विवेक विलणकर हे स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे अधिकृत लेव्हल2 कोच आहेत. त्यांनी लेव्हल 1 बंगलोर आणि लेव्हल 2 पटियाला पंजाब येथे यशस्वीरित्या पूर्ण करून सध्या ते साळवी स्टॉप जलतरण तलाव येथे ते प्रशिक्षण देतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 17-03-2025