चिपळूण : पूर्वीच्या मारामारीचा राग मनात ठेवून १५ जणांनी मारण्याच्या उद्देशाने एकाच्या घरात प्रवेश केल्याची घटना तालुक्यातील नांदिवसे-राधानगर येथे बुधवारी घडली. यातील दोघांच्या हातामध्ये लाठी व सळया होत्या. याप्रकरणी गुरुवारी (ता. १४) अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमर आत्माराम जोशी, आत्माराम जोशी, रोशन रवींद्र भाताडे (तिघेही आकले) व अन्य १५ जण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याची फिर्याद राकेश रवींद्र शिंदे (३६, नांदिवसे-राधानगर) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ला सायंकाळी गाणे येथे गाडीला बाजू देण्याच्या कारणावरून अमर जोशी व राकेश शिंदे यांच्यात वाद झाला होता. हा राग मनात धरून अमर जोशी, आत्माराम जोशी, रोशन भाताडे याच्यासह १५ व्यक्ती राकेश शिंदे यांच्या नांदिवसे-राधानगर येथील घरी गेले. त्यापैकी दोन व्यक्तींच्या हातात लाठी व लोखंडी सळई होत्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 17/Mar/2025














