खेड : येथील महसूल विभागाचे तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पंधरावड्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेल्या घेरा रसाळगडावर महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबवले. या अंतर्गत गडावरचा संपूर्ण परिसर स्वच्छ करुन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. या स्वच्छता अभियानबाबत पंचक्रोशीतून महसूल विभागावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तहसीलदार सुधीर सोनावणे यांनीही स्वच्छता अभियानमध्ये सहभाग घेतला. त्यांच्यासोबत अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत गडावरील परिसर स्वच्छ केला. गडावरील कचरा, वाढलेली झाडी-झुडपे आदी गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या पुढेही असा उपक्रम राबवण्याचा निर्णय यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:29 PM 17/Mar/2025














