राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण

कोल्हापूर : कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. यानंतर ते कोल्हापूर येथील सयाजी हॉटेलमध्ये संविधान संमेलन घेणार आहेत.

या ठिकाणी ते बाराशे निमंत्रितांसोबत विचार मंथन करणार आहेत. राहुल गांधी संविधान संमेलनातून कोणती भूमिका घेत महाराष्ट्राच्या निवडणुकीला सामोरे जाणार याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.

राहुल गांधी शुक्रवारीच कोल्हापुरात शिवरायांच्या पुतळा अनावरणासाठी येणार होते, परंतु यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कालचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला, त्यानंतर आज ते कोल्हापुरात दाखल झाले.

राहुल गांधी शुक्रवारीच कोल्हापुरात शिवरायांच्या पुतळा अनावरणासाठी येणार होते, परंतु यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कालचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला, त्यानंतर आज ते कोल्हापुरात दाखल झाले.

“आज आपण मूर्तीचं अनावरण करत आहोत. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. हा केवळ एक पुतळा नाही. पुतळा जेव्हा बनवतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या विचारधारेला, त्यांच्या कर्माला मनापासून समर्थन करतो. आपण इथे आलो किंवा कुणी मूर्तीचं अनावरण केलं. शिवाजी महाराज ज्या गोष्टींसाठी आयुष्यभर लढले, त्या गोष्टीसाठी आपण लढलो नाही तर पुतळा अनावरणाला काही अर्थ नाही. जेव्हा पुतळ्याचं अनावरण करतो, तेव्हा शिवाजी महाराज जसं लढले, ज्या गोष्टींसाठी लढले तेवढं नाही, पण थोडं तरी काम आपण केलं नाही” असं राहुल गांधी म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:16 05-10-2024