रामपूर : राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची मार्केट योजना सुरू झाली आहे. यावर्षी चिपळूण तालुक्यात १४८ रेशन धान्य दुकानातून अंत्योदय शिधापत्रिकाधारक ६ हजार २५१ महिलांना मोफत साडी वाटप सुरू झाले आहे. चिपळूण तालुक्यात अंत्योदय शिधापत्रिका ६ हजार २४८ आहेत.
प्राधान्य शिधापत्रिका ३५ हजार ८८६, शुभ्र शिधापत्रिका १० हजार ४२५ तर केशरी शिधापत्रिका ४३ हजार ८०२ आहेत. प्रत्येक महिन्यात शिधापत्रिका नोंद वाढते. या बाबतची माहिती चिपळूण पुरवठा विभागाकडून प्राप्त झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 18/Mar/2025














