रत्नागिरी : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या दशावतार प्रयोगात्मक कला शिबिराला सोमवारी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात प्रारंभ झाला.
राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. या सोहळ्यात दशावतारचे भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्र शासनाच्या लोककला पुरस्काराने सन्मानित यशवंत तेंडुलकर यांचा सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम लोककला संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, दशावतार संस्कृतीला नवा आयाम देणारा आहे, असे यावेळी श्री. सामंत यांनी यावेळी म्हटले.
कार्यक्रमास गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य मकरंद सुखटणकर, सतीश शेवडे, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, शहर प्रमुख बिपिन बंदरकर तसेच मोठ्या संख्येने कोकणी कलाकार उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 18-03-2025














