देवरूख बसस्थानकात नो पार्किंग ठिकाणी वाहन तळ

सावर्डे : संगमेश्वर तालुक्यातील देवरूख बस स्थानक खासगी वाहनांचे तळ बनले आहे. ही वाहने स्थानिक आधिकाऱ्यांच्या कार्यालयापुढे फलाटाजवळ व नो पार्किंगच्या फलकासमोर लावली जात आहेत. याबाबत येथील एसटी अधिकारीही कोणतीच भूमिका घेत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या स्थानकात प्रवाशांची कायम गर्दी असते. या प्रवाशांना या खासगी गाड्यांमुळे प्रचंड त्रास होतो. या बस स्थानकाच्या फलाटासमोरच दुचाकीसह अन्य वाहने उभी केली जात आहेत. यामध्ये एसटी बस कर्मचारी व प्रवाशांची वाहने आहेत. ही वाहने स्थानकाच्या आवारात अन्य जागी उभी करणे शक्य आहे. याठिकाणी नो पार्किंगचा फलक लावला आहे. त्या फलकाला न जुमानता ही वाहने उभी केली आहेत. या वाहनांमुळे प्रवाशांना फिरताना, बस चालकांना बस फलाटात लावताना अडचणी येतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 18/Mar/2025

Happy journey marathi