चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या सेवादलच्या चिपळूण शहराध्यक्षपदी कय्यूम उर्फ बंटी मणियार यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्या हस्ते त्यांना निवड पत्र देण्यात आले.
चिपळूणचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष रमेशभाई कदम आणि प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव आणि सेवादलचे प्रदेशाध्यक्ष जानबा म्हस्के यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून कय्यूम मणियार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रीय झाले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची चिपळूण शहरात जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. तरुणांची बळकट फळी उभी करण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवादल विभागाचे जिल्हाध्यक्ष अन्वर जबले यांनीही चिपळूण शहराच्या कार्यकारिणीत तरुणांना संधी देत शहरात पक्ष बळकटीचे प्रयत्न सुरू केले आहेत. कय्यूम मणियार यांची सेवादलच्या चिपळूणशहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्या हस्ते मणियार यांना गुरुवारी (ता. 03) पक्षाच्या चिपळूणमधील संपर्क कार्यालयात निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी सेवादलचे जिल्हाध्यक्ष अन्वर जबले यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रतन पवार, जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन पवार, दिनेश शिंदे, एजाज माखजनकर, राष्ट्रवादी युवकचे शहर उपाध्यक्ष जुनेद मेमन आदी उपस्थित होते. प्रशांत यादव यांनी कय्यूम मणियार यांचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 05/Oct/2024