रत्नागिरी : दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. संजय कदम यांचा थोड्यात वेळात होणार शिवसेनेत प्रवेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम व शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत आज दुपारी 3 वाजता मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
संजय कदम हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संलग्न होते आणि त्यांनी स्थानिक राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मागील निवडणुकीच्गेया वेळी त्ल्यायांनी ठाकरे गटात देखील प्रवेश केला होता. काही महिन्यांपासून त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांना पक्षात महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.या प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संजय कदम यांच्या अनुभवाचा आणि जनसंपर्काचा फायदा पक्षाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उदय सामंत यांनी यापूर्वीच अनेक नेत्यांना शिंदे गटात आणण्याचे संकेत दिले होते, आणि संजय कदम यांचा प्रवेश हा त्याच रणनीतीचा भाग मानला जात आहे.या सोहळ्यासाठी रत्नागिरीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित राहणार असून, ढोल-ताशांच्या गजरात हा कार्यक्रम संपन्न होईल, अशी माहिती पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:44 PM 18/Mar/2025












