खेड : शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत अद्यापही कायम आहे. भटक्या कुत्र्यांना रोखण्यासाठी नगर प्रशासनाने निर्बीजीकरणाची मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला होता; मात्र प्रत्यक्षात ही मोहीम अनेक महिने निविदा प्रक्रियेत अडकली होती. खेड पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून महादेव रोडगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या मोहिमेला गती आली असून, येत्या पंधरा दिवसांत मोकाट श्वानांची निर्बीजीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
भटक्या कुत्र्यांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात सर्वच भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे.
यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. व्यापारीही जेरीस आले आहेत. शहरातील भटक्या कुत्र्यांचा वावर रोखण्यासाठी नगर प्रशासनाने निर्बीजीकरण मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी रितसर निविदाही काढली होती. शहरात रहदारीच्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर असताना नगर प्रशासन निर्बीजीकरणाची मोहीम सुरू करणार असल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
पालिकेच्यावतीने काढलेली निविदा दिवसांमध्ये भटक्या श्वानांची निर्बिजीकरण मोहीम पालिकेच्यावतीने सुरू करण्यात येईल- महादेव रोडगे, मुख्याधिकारी खेड नगरपालिका
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:16 PM 18/Mar/2025














